सर्दी, खोकला, ताप | Dr. swagat todkar घरगुती उपाय..

सर्दी, खोकला व ताप यावर Dr. Swagat todkar यांचे घरगुती उपाय व काही इतर उपाय.

सर्दी, खोकला व ताप हे साधे आजार आहेत पण त्यावर काही उपचार न केल्यास ते भयानक होऊ शकतात. त्यामुळे त्यावर उपाय करणे गरजेचे आहे. त्यामुळे पुढे दिलेल्या काही मुद्यांची उत्तरे खाली दिली आहेत जसे सर्दी खोकल्याची लक्षणे, तापाची लक्षणे, Dr. Swagat todkar याचे घरगुती उपाय, इतर घरगुती उपाय, सर्दी व खोकल्याचे उपाय , तापावरील उपाय इत्यादी.

  आपल्याला सर्दी, खोकला व ताप हे पावसाळ्यातच का होतात?

               ऋतूमान बदलत असल्याने पावसाळ्याच्या सुरवातीला सर्दी, खोकला व तापाचा त्रास होतच असतो.
  कारण की,
               आजच्या जगात आपण सर्व शेतीवर व झाडांवर केमिकल युक्त फवारणी करतो. याने हे केमिकल धुळीत मिसळून आपल्या नाका तोंडात जाते किंवा पावसाळ्यात पाण्यामार्फत वाहून ते पाण्यात मिक्स होऊ शकते आणि हेच पाणी आपण न गाळाता/फिल्टर करता किंवा न उकळता पितो. याने आपल्या पावसाळ्याच्या सुरुवातीला सर्दी, खोकला व ताप येऊ शकतो.
          त्यामुळे पावसाळ्यात पाणी गाळून व गरम करून प्यावे.(पाणी उखळवा व थंड करून मडक्यात/भांड्यात ठेवा मग दिवसभर पिया.)

  सर्दी, खोकला व ताप यांची माहिती व लक्षणे

  सर्दीची माहिती -  

             सर्दी हा महाभयंकर आजार नाही आहे तर ती एका व्हायरस मुळे होत असते. 200 पेक्षा अधिक प्रकारचे व्हायरस या रोगाला कारणीभूत असतात, पण राइनो व्हायरस यातला सर्वात जास्त प्रमाणात आढळतो आणि 50% सर्दी याच मुळे होते.

  सर्दी ही त्रास दायक व भीतीदायक रोग नाही आहे पण ती जास्त प्रमाणात असली तर ती त्रासदायक असु शकते. सर्दी ही पावसात भिजल्याने, थंड पाणी प्यायल्याने, थंड गोष्टी खाल्याने, जास्त धूळ नाका तोंडात गेल्याने ही होऊ शकते.पण, सर्दी ही थोड्या उपचाराने बरी होऊ शकते.


  सर्दी, खोकला, ताप | Dr. swagat todkar घरगुती उपाय..
                                              image source-google|image credit-website 


  सर्दीची लक्षणे - 

   नाक गळणे, गळ्यात घवघवणे, गळयात जड वाटणे, खूप शिंका येणे ही लक्षणे दिसून येतात.

  खोकल्या ची माहिती -

   खोकल्याचे दोन प्रकार आहेत. साधा खोकला व कोरडा खोकला. साध्या खोकल्यात कफ/ शेंबूड तयार होतो व सर्दी ही होऊ शकते.
   कोरडया खोकल्यात कफची निर्मिती होत नाही व खोकताना घसा दुखतो.

  सर्दी, खोकला, ताप | Dr. swagat todkar घरगुती उपाय..
                                              image source-google|image credit- website 


  खोकल्याची लक्षणे:-

  1. घसा खवखवणे, घसा कोरडा पडणे, 
  2. घसा दुखणे, घसा जाम होणे,
  3. सर्दी जास्त काळ असल्याने खोकला येण्याचे प्रमाण वाढते.

  तापाची माहिती- 

            मानवी शरीराचे तापमान हे 37℃ डिगरी सेल्सिअस मध्ये तर 98.6F म्हणजे fahrenheit मध्ये मोजले जाते. आपल्या बुद्धी च्या वापराने हे तापमान 1℃ ने वाढले किंवा कमी होऊ शकते. पण हे तापमान जेव्हा 1℃ पेक्षा जास्त वाढले असेल तेव्हा ताप आला असे समजा वे.

  सर्दी, खोकला, ताप | Dr. swagat todkar घरगुती उपाय..
                                                      image source-google|image credit- website 


  तापाची लक्षणे - 

  1. थरथरणे व थंडी वाजणे.
  2. शरीर गरम होणे / डोके गरम होणे.
  3. अशक्तपणा, भूक न लागणे, डोके दुखणे, उलट्या होणे.
  4. डोळे दुखणे किंवा डोळे लालसर होणे.
  5. स्नायू दुखणे व सांधे दुखणे. इतर,

              ताप जर कमी असेल तर घरगुती उपाय करून किंवा डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवून पण घालवू शकता.
         जर तापमान जास्तच वाढले असेल तर त्वरित डॉक्टरांकडे जाऊन भेट द्यावी.

  सर्दी, खोकला व ताप यावर Dr. Swagat todkar यांचे घरगुती उपाय

  सर्दी, खोकला, ताप | Dr. swagat todkar घरगुती उपाय..

  ◆ ताप

  1. एक वाटी दुध घेवून त्यात अर्धा चमचा हळद व 1 चमचा सुंट पावडर टाकून ते उखळवा आणि गाळून प्या, यानंतर अंगावर घेऊन झोपावे. याने तुमचा ताप अर्ध्या तासात निघून जाईल.

  2. सुंट पावडर व दालचिनी पावडर एक एक चमचा घेऊन 3 कप पाण्यात टाकून ते 1 कप ऐवढं करा आणि हा काडा अर्धा चमचा सकाळी व संध्याकाळी घ्या. याने ताप, सर्दी व खोकला निघालो जातो.

  ◆ खोकला

  1. कांद्याचा रस काढून चार ते पाच चमचे घ्या व तो रस पिऊन त्यावर उभे राहून पाणी प्यावे. याने तुमचा खोकला एका दिवसात बरा होईल.

  2. तुळशीच्या पानांच्या रसामध्ये थोडेसे कापूर घालून ते मिश्रण पिया आणि त्यावर तांब्यांभर गरम पाण्यानी गुळण्या कराव्यात. या उपायाने लगेच खोकला जातो.

  3. अर्धा चमचा दालचिनी पावडर एक ग्लास दुधात मिसळून उकळावे व ते गाळून प्यावे, याने कप व खोकला निघून जातो.

  4. एक वेलदोडा घेऊन सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तो खाऊन संपवावा, याने खोकला नाहीसा होतो.

  5. घाणेरीच्या पाण्यात कपरी कात घालून ती एका दिवसात सकाळ, दुपार व संध्याकाळ घ्यावे.

  6. लवंग, मिरी व सुंठ याचा काडा करून पियावेत, याने तुमचा सर्दी, खोकला निघून जातो.

  7. जिरा व ओवा याचा काडा करून पियावा.

  8. कपरी कात उगाळून घ्यावे व त्यावर कोमट पाणी प्यावे, या उपायाने तुमचा घसा बसलेला असेल तर ठीक होईल व घशाच्या समस्या दूर होईल.

  ◆ सर्दी / कप

  1. दहा थेंब लसणाचा रस व दोन थेंब मध घेऊन ते एक कप गरम पाण्यात मिक्स करा व ते अनुशी पोटी प्यावे. याने रोगप्रतिकारक शक्ती वाढेल, ताकद मिळेल आणि घसा व नाकाची समस्या दूर होतील.

  2. मोसंबीचा रस व पाणी सम प्रमाणात एक ग्लास एवढे घ्यावे आणि त्यात सुंट व जिरा पावडर अर्धा चमचा टाका, आता हे मिश्रण सकाळी उठून अनुशी पोटी घ्यावे.
  या उपायाने पचनक्रिया नीट चालते व कपचा त्रास निघून जातो.

  3. जेष्ठ मधाच्या काड्यांचा किंवा पावडरचा काडा करून प्यावा, याने ताप, सर्दी व खोकला निघून जातो.

  4. तूप कोमट करून दिवसातून फ़क्त एक चमचा थोडं थोडं करून पियलात तर त्याने खोकल्यावर व सर्दी वर परिणाम होतो.

  5. जायफळ व व्यकंड हे तुपात उगाळून त्याचा लेप तयार करावे आणि तो लेप कपाळावर व घस्यावर लावावा, याने सर्दी व खोकल्याचा त्रास निघून जाईल.

  इतर घरगुती उपाय:- 

  ◆ ताप

  1. गुळवेल च्या काड्या घेऊन त्या ठेचून एक ग्लास पाण्यात टाकून ग्लास अर्धा होईपर्यंत उकळावे व थंड करून प्यावे. याने कोणत्याही प्रकारचा ताप निघून जाईल.

  2. तुळशीच्या पानांचा काडा तयार करून त्यात थोडी वेलची पूड घालून पिल्याने ताप उतरतो.

  3. मेथी, पुदिना आणि आलं थोड्या प्रमाणात घेऊन त्यात मध घालून काडा बनवून प्यावे.

  4. बेलफळाचे चूर्ण हे पाण्यात घालून ते ताप उतरेपर्यंत प्यावेत.

  5. 20 ते 25 मनुके घेऊन चुरावे व ते लिंबाच्या रसामध्ये घालावे आणि हे मिश्रण दिवसातून दोन वेळा घ्यावे.

  ◆खोकला

  1. डाळिंबाचा रस काढून तो करून पियावेत किंवा डाळिंबाचे दाणे थोडे भाजून/गरम करून खावेत, याने खोकला बरा होतो.

  2.आल्याचा रस व खाऊच्या पानांचं रस घ्या व तो गरम करून मध टाकून पिया. याने सर्दी, सुखा खोकला व साधा खोकला निघून जातो.

  3. आलं घ्यावेत व त्याला आगीवर थोडे भाजावे मग नंतर त्याला हळदी मध्ये टाका व यानंतर ते खा. याने एका मिनिटात खोकला थांबतो.

  4. पाण्यात हळद टाकून चहासारखे करून पिया किंवा दुधात हळद टाकून पिया.

  ◆सर्दी/कप

  1.आल्याचा एक तुकडा घेऊन तो कपभर पाण्यात उकळवून त्यात साखर घालून प्यायल्याने आराम मिळेल.

  2. आल्याचा चहा हा सर्दी वर खूप उपयुक्त ठरेल.

  3. एक चमचा आलं-लसुणचा रस, एक चमचा लिंबाचा रस, पाव चमचा हळद, थोडी मध आणि थोडी काळी मिरी पूड हे सर्व एकत्र करून दिवसातून तीन वेळा घ्यावे.

  4. सर्दी सोबत घसा ही दुखत असेल तर कोमट पाण्यात हळद, मीठ आणि मध घालून गुळण्या केल्याने घसा दुखी थांबते.

  5. तीन ते चार लसुण ठेचून कपभर पाण्यात उकळावे आणि ते पाणी दिवसातून दोन वेळा घ्यावे. याने सर्दीत आराम मिळतो.

  टिप्स

  1. जर तुम्हाला सर्दी, खोकला व ताप  सारखा नको असेल तर अंघोळ करताना तोंड भरेल इतके पाणी घेऊन ठेवावे मग ते अंघोळ होईपर्यंत ठेवावे व थुकावे. असे दररोज करावे. सुरवातीला तुम्हाला जितक्या वेळ जमतंय तितक्या वेळ ठेवा आणि थुकून परत घ्या. याने सर्दी, खोकला व ताप सारखा येणे बंद होईल, स्टॅमिना वाढेल व फुफ्फुस अजून बळकट होते.

  2. थंड पाणी पिऊ नयेत व बाहेर चे पदार्थ खाऊ नयेत

  3. थंड फ्रिजमधले पाणी लगेच काढून पिऊ नयेत ते जर 5 मिनिटे ठेवून मग पियावेत.

  4. अंघोळीच्या पाण्यात सारखी फेर बदल करू नयेत, म्हणजे कधी थंड तर कधी गरम पाण्यांनी अंघोळ असे केल्याने आपल्या शरीरावर परिमाण होतो व आपल्याला सर्दी व ताप येऊ शकतो.

  5. पावसाळ्यात नेहमी पाणी उखळवून प्यावेत. पाणी गरम किंवा ते थोडं साधं करून प्यावेत. याने सर्दी, खोकला व ताप यांसारखे बरेच व्हायरल आजार होणार नाहीत.

  6. उन्हामध्ये जास्त फिरल्याने ही लहान मुलांना ताप येण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांची काळजी घ्यावी व त्यांना कमी उन्हात पाठवावे किंवा टोपी घालायला सांगावेत.

  7. उन्हाळ्यात जास्त गरम होतंय म्हणून बाहेरून आल्यावर लगेच थंड पाणी पिऊ किंवा थंड पदार्थ  खाऊ नयेत. ते थोड्या वेळाने म्हणजे अर्धा ते पाऊण तासानंतर घ्यावे.

  8. बाहेरील जास्त तेलकट  पदार्थ खाऊ नयेत त्यामुळे घसा बसणे, खोकला व घसा खवखवणे असे रोग होऊ शकतात.

  वरील दिलेल्या माहिती मधून सर्दीची लक्षणे,सर्दी खोकल्याची लक्षणे, तापाची लक्षणे, Dr. Swagat todkar याचे घरगुती उपाय, इतर घरगुती उपाय, सर्दी व खोकल्याचे उपाय , तापावरील उपाय तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील 
  तुम्ही ही माहिती तुमच्या मित्रांना, परिवाराला व जवळच्या लोकांना पाठवा,
  धन्यवाद (Thank You).  Post a Comment

  0 Comments