Dr. Swagat Todkar यांची संपूर्ण माहिती

Dr. Swagat Todkar यांची संपूर्ण माहिती- वयक्तिक तसेच त्यांची Age, Youtube channel, Contact Number आणि त्यांच्या घरगुती उपचारांची माहिती 


तुम्हाला आज डॉक्टर तोडकर यांच्या बद्दलची जी माहिती पाहिजे आहे, ती तुम्हाला या पोस्ट मधून मिळेल. या पोस्ट मध्ये त्यांच्या बद्द्ल ची सर्व माहिती दिली आहे.

1. स्वागत तोडकर यांची माहिती (Swagat Todkar information) 

              स्वागत तोडकर हे एक प्रसिध्द व्यक्तीमत्त्व आहेत आणि तुम्ही त्यांचे नाव ऐकलेच असेल. त्यांच्या उपचारांनी लाखो करोडो लोक बरे झाले आहेत.

तोडकर यांच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसूनही त्यांनी निसर्गोपचार आणि आयुर्वेदिक विद्या शिकून त्यांचा अवलंब लोकांवर केला आहे.

ते जरी पदवीधर डॉक्टर नसले तरी ते त्यांच्या रुग्णांसाठी डॉक्टरच आहेत कारण, खूप पैसे खर्च करूनही उपचार न झालेले रुग्ण त्यांच्या घरगुती उपचारांनी ठीक होतात आणि डॉक्टरांचे कामच असते रूग्णांना बरं करणे आणि तेच काम तोडकर करत आहेत, असे मला वाटते.

Dr. Swagat Todkar यांची संपूर्ण वयक्तिक तसेच त्यांची Age, Youtube channel, Contact Number, Clinic Address आणि त्यांच्या घरगुती उपचारांची माहिती
   Image source:- Google | Image credit:- website

 
 स्वागत तोडकर हे कोल्हापूर मध्ये राहतात आणि तेथेच त्यांचे तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र आहे, जिथे ते आपल्या रूग्णांवर उपचार करतात. त्यांच्याकडे दिवसाला दोनशे ते अडीचसे रुग्ण उपचारासाठी येतात असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले आहे. त्याांनी खुप ठिकाणी भाषणे करून लोकांमध्ये आपल्या घरगुती उपचारांनबद्दल माहिती दिली आहे.

              त्यांना काही कारणांस्तव काही वेळासाठी तुरूंगवास ही भोगावा लागला आहे आणि त्यांची बोगस डॉक्टर म्हणून कुप्रसिद्धी ही झाली आहे. तरी त्यांच्याकडे रुग्णांची गर्दी कमी नाही झाली.

2. स्वागत तोडकर यांचे वय (Swagat Todkar age)

       स्वागत तोडकर यांचे वय हे पन्नासपेक्षा (+50) अधिक आहे , असे त्यांनी आपल्या एका भाषणात म्हटलं आहे. पण त्यांना पाहता क्षणी आपल्याला त्यांचे वय हे पस्तीस ते चाळीस इतके वाटेल.
        माझ्या मते, जे ते लोकांना  आपल्या भाषणातून सांगतात ते आधी स्वतःवर अवलंबून पाहत असतील, त्यामुळे त्यांचे वय दिसून येत नाही. आपणही या प्रकारे आपली काळजी घेऊन स्वस्त व निरोगी राहिल पाहिजे.

3. "मराठी डॉक्टर" युट्युब चॅनेल (Marathi Doctor YouTube channel)

Dr. Swagat Todkar यांची संपूर्ण वयक्तिक तसेच त्यांची Age, Youtube channel, Contact Number, Clinic Address आणि त्यांच्या घरगुती उपचारांची माहिती

             डॉक्टरांचे हे स्वतःचे एक युट्युब चॅनेल आहे. त्यांच्या चॅनेल चे नाव मराठी डॉक्टर (Marathi Doctor) असे आहे. त्यांनी या युट्युब चॅनेल ची सुरुवात  April 18, 2019 रोजी केली आणि त्यांचे संपूर्ण 106,925,220 एवढे व्हिएवस (views) झाले आहेत, म्हणजे त्यांचे विडिओ एवढ्या वेळा पाहिले गेले आहेत.
             त्यांनी तब्बल एकाच वर्षात युट्युबर 1.06M एवढे Subscriber वाढवले आहेत यावरून त्यांची किती प्रसिद्धी आहे याचा अंदाज आपल्या येतो. ते त्यांच्या चॅनेल वर (काही दिवसांनच्या कालावधीमध्ये) लोकांसाठी घरगुती उपचारांचे विडिओ टाकत असतात आणि त्यांना खुप Views ही येतात. लोक ते पाहून त्याच्या उपचारांचा वापर आपल्या जीवनात करतात. तुम्ही या चॅनलला Subscribe करु शकता, खाली दिलेल्या लिंक वरून.            

4. स्वागत तोडकरांचे फेसबुक पेज (His Facebook page)

           डॉक्टरांचे एक फेसबुक वर पेज आहे, त्यावर ते युट्युब चॅनेलच्या लिंक शेअर करतात, तसेच फोटोस, पोस्ट आणि विडिओ टाकतात. त्यांच्या फेसबुक पेजचे नाव मराठी डॉक्टर ऑफिसल (Marathi doctor official) असे आहे. या पेज ला खुप सारे लाइक आणि व्हिएवस आहेत.  या पेजचे  सुमारे 2,10,041 एवढे फॉलोवर आणि 1,38,991 एवढ्या लाइक आहेत. या पेजची लिंक खाली दिली आहे.

               

5. तोडकर यांचे घरगुती उपचार (Todkar's homemade remedies)


Dr. Swagat Todkar यांची संपूर्ण वयक्तिक तसेच त्यांची Age, Youtube channel, Contact Number, Clinic Address आणि त्यांच्या घरगुती उपचारांची माहिती
Image source:- Google | Image credit:- website
                                  
            तोडकर त्यांच्या व्याख्यानातून दरवेळी रोगावरील उपचारांची काहीतरी माहिती देतच असतात. त्यांनी त्यांच्या युट्युब चॅनेलवर घरगुती उपचारांचे खुप सारे व्हिडिओ टाकले आहेत. त्यांनी सांगितलेले सर्व उपचार हे मुळात घरगुतीच असतात. 

                ते दरवेळी आपल्या व्याख्यानातून,  आपण नैसर्गिक रित्या घरगुती किंवा आयुर्वेदिक औषधे वापरून रोगांवर मात कसे करू शकतो याबद्दल सांगतात. आपण आपल्या काही सवयी बदल्या, तर आपण एक चांगलं व निरोगी आयुष्य जगु शकतो.

                त्यांचे असे म्हणणे आहे की, आपणकेमिकल्स (Chemical) युक्त औषधे खाऊन आपल्या शरीराला हानी (त्रास) पोहोचवतो. त्यामुळे आपण घरगुती आयुर्वेदिक उपचार पहिले केले पाहिजेत, नंतर फरक न जाणवल्यास दुसरे उपचार केले पाहिजेत. • डॉक्टरांचे काही घरगुती उपचार

 1.  केसगळती थांबवण्यासाठी कोमट पाण्यात लिंबू पिळून अंघोळ करावी असे तुम्ही   आठवडयातून एक वेळ करावे, त्याने केस गळती थांबेल.
 2.  आवळ्याच्या पावडरमध्ये लिंबू पिळत राहावे त्याची मेहंदी होईपर्यंत नंतर ते 10 ते 15 मिनटे ठेवून, मग डोक्याला लावावे. असे रात्री झोपताना लावा व सकाळी धूवून टाका. हे आठवड्यातून दोन वेळा केल्यावर सर्व केस काळेभोर होणार आणि तुम्हाला डाय करायची गरज पडणार नाही.
 3. अपचनाचा त्रास रोखण्यासाठी कांदयावर लिंबू पिळा व 10 मिनिटे ठेवा, मग खा. याने अपचन होणे, करपट ढेकर येणे हे कमी होते, तसेच शरीररातील उष्णता ही कमी होते.
 4. तुम्हाला जर डोकेदुखी होत असेल तर लसूण पाकळी चुरडून डोक्याला लावा त्याने डोकेदुखी कमी होईल.
 5. अर्धशिशीचा त्रास होत असेल, तर आल आणि लसूण एकत्र खिसून थोडस गरम करावे ते एकत्र होईपर्यंत (जास्त गरम करू नका त्याने जखम होईल) मग त्याचा लेप डोक्याला लावा, त्याने तुमचा त्रास निघून जाईल.
 6. जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर, पित्त निघून जाण्यासाठी सकाळी उठून खूप सारे कोमट पाणी प्या व मग उलटी करा. असे तुम्ही आठवड्यातून एकदा करा पित्त निघून जाईल. तसेच जमले तर त्यात लिंबू पिळा व मीठ टाका. त्याने तुमचे पूर्ण पित्त साफ होईल.
 7. सकाळी उठून पाण्यामध्ये चार ते पाच तुळसीचे पाने टाकून उकळून नंतर गाळून ते चहाऐवजी प्यावे, त्याने पित्त, उष्णता, लघवीचा त्रास व शरीरातील सर्व टॉक्सिक निघून जाते आणि रक्त शुद्धीकरण ही होते.
 8. चिमूटभर मीठ जिभेवर ठेवुन अर्धा मिनिटे थांबा मग त्यावर अर्धा ग्लास पाणी प्या याने डोकेदुखी लगेच थांबेल.
 9.  सहा मोरआवळ्याचे तुकडे घ्या व 4 लिटर पाण्यात टाका आणि हे पाणी कडक उखळवा (जेवढं जमेल तेवढं) नंतर अर्ध उतरल्यावर (पाणी) गाळून घ्या व ते कोमट झाल्यावर केसांच्या मुळांना माँलिस करा नंतर 10 ते 15 मिनिटे थांबा मग साध्या पाण्यानी अंघोळ करू शकता याने केस गळती थांबेल.
 10. सर्व सर्दी काढून टाकण्यासाठी उपाय - गूळ आणि सुंट सम प्रमाणात अर्धा चमच्या एवढे उगळा आणि त्यात अर्धा चमचा पाणी घाला, मग ते गरम करा व पांढऱ्या कपड्यात गाळून ते अर्धा चमच्याभर नाकात सोडून 10 मिनिटे पाठीमागे डोके करून बसा. याने 2 ते 3 मिनिटात शिंक येऊन सर्व सर्दी बाहेर येते. हा उपाय एकदा करावा जर सर्दी जास्तच असेल तर अर्ध्या तासाने परत एकदा करावे.


6. डॉक्टर तोडकर यांच्या रुग्णालयाचा पत्ता (Swagat Todkar clinic address)

तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र, ऍक्सिस बँक शेजारी, 
पद्माराजे गर्ल्स हायस्कूल जवळ, सिद्धाळा गार्डन समोर, 
न्यू महाद्वार रोड, कोल्हापूर. 
हा त्यांच्या रुग्णालयाचा पत्ता आहे.

7. स्वागत तोडकर यांचा फोन नंबर (Swagat Todkar contact number)

डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट घेण्यासाठी, भेट घेण्यासाठी, घरगुती उपचारासाठी, औषधे व इतर

माहितीसाठी संपर्क करावा,


Mobile no./ Contact no. - 02312688800

8. तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राची औषधे उपलब्ध असलेली ठिकाणे व त्यांचे फोन नंबर

 • Mumbai, Hitesh, and sons -  9967570613, 8108661394, 9372315773
 • Navi Mumbai - 9820999609
 • Vikroli, Mumbai - 9833185862
 • Nagpur, Chandrapur, Vidarbha - 9823159241, 9834197057
 • Ahmednagar - 02412355925, 9822451495
 • Amravati - 9028626919, 9404874431
 • Satara - 9423262267
 • Karad - 9922099002
 • Solapur - 9423590035
 • Dhule Khandesh - 9423191775
 • Nanded - 9860188971
 • Nashik - 9822023696
 • Pune, PCMC and All Maharashtra - 9765577977, 9881199566,              9823010734, 9881199233

    

9. हॉस्पिटलचे नाव व वेळ (Hospital name and Timing ) 

हॉस्पिटलचे नाव - तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र
वेळ :-  सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:00
चालू :- सोमवार ते शनिवार
बंद :- रविवार

    
वरील दिलेली, 
          डॉ. स्वागत तोडकर यांची सर्व माहिती ही त्यांच्या व्याख्यानातून व त्यांच्या युट्युब चॅनेलवरून तसेच काही लेखांमधून घेतली आहे. तर जरी काय चूक झाली असेल तर, मला माफ करा व कमेंटमध्ये सांगा आणि हे आर्टिकल (Article) तुमच्या जवळच्या लोकांना, मित्रांना व परिवारातील सदस्यांना जरून पाठवा.
         आमची ही पोस्ट वाचल्याबद्दल तुमचे खुप आभार.☺️☺️


Post a Comment

2 Comments

 1. 🙏नमस्कार डॉक्टर स्वागत तोडकर
  मी मुंबई येथून आहे. गेले काही दिवस माजी आई किडनीच्या आजाराने त्रस्त आहे. हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे. कुठे ही उपचार होत नाही.खर्च भरपुर आहे पण परिस्थिती नाही. आपण मला काहीतरी उपाय सांगा
  तसेच आपला मोबाईल नंबर सांगा ही नम्र विनंती. नाहीतर औषधं सांगा पण उपचार सांगा.
  धन्यवाद
  🙏 महेंद्र लिंगायत

  ReplyDelete
 2. सर माझ्या लहान भाऊंचे फुफ्फुस खराब झाले आहे याच्या वर उपचार आहे का सर लवकर कळवा हि विनंती आहे

  ReplyDelete