केस गळतीची कारणे व 15+ केसांवरील टिप्स | स्वागत तोडकर |

केस गळतीची कारणे व केसांवरील टिप्स आणि स्वागत तोडकर यांचे घरगुती उपाय:- 

केसांचे महत्त्व काय आहे व त्यांची काळजी कशी करावी आणि केस गळती कशी थांबवावी या बद्दल पुढे सांगितले आहे आणि dr. Swagat todkar यांनी केस गळती वर काही घरगुती उपाय दिले आहेत.

  केसांचे महत्त्व 

       केस हे सर्वांच्या सौंदर्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. केस हे कवटीला व मेंदूला संरक्षण देण्यासाठी दिलेला महत्वपूर्ण अवयव आहे. 
         आपण नेहमी घराबाहेर पडताना चेहऱ्याबरोबर केसांनाही नीटनेटके करतो. केसांनमुळे आपणास आत्मविश्वास मिळतो आणि ती कमी होऊ लागल्यावर तो कमी होत जातो, त्यामुळे केसांना चेहऱ्याइतकेच महत्त्व आहे. ज्यांची केस कमी होत असतात त्यांना त्याची जास्त काळजी आणि महत्त्व असते.
         तुमचे पण केस गळत आहेत का? जर गळत असतील तर ते थांबवण्यासाठी पुढे उपाय दिले आहेत, ते वाचा....
  केस गळतीची कारणे | केसांवरील टिप्स | स्वागत तोडकर यांचे घरगुती उपाय
                                                  image source-google|image credit-quora

  काय कारण असेल, केस गळतीचे? 

        पूर्वी केस गळतीची सुरुवात ही खूप उशिरा म्हणजे चाळीशीनंतर होत होती, पण आजच्या या धावपळीच्या युगात केस गळतीची सुरुवात ही लवकरच होत असे.
        केसांची न घेतलेली काळजी, आहारात न पाळलेले नियम, कोणत्याही प्रकारचा वापरलेले हेअर प्रॉडक्ट आणि खूप प्रमाणात घेतलेला स्ट्रेस/ताण यामुळे केसांच्या गळतीची सुरुवात ही 15 ते 20 दरम्यान होऊ शकते. त्यामुळे त्यांची निघा राखणे व काळजी घेणे जरुरी आहे.

  आता आपण केस गळतीची काही कारणे पाहुयात


  1. आपण रोजच्या जीवनात खूप सारा ताण/ स्ट्रेस घेतो त्याने केस गळती होऊ शकते.
  2. शरीरात आयर्न (Iron) ची कमी असणे.
  3. शरीरात व्हिटॅमिन- सी (vitamin- c) ची कमी असणे.
  4. शरीरामध्ये प्रोटीन (protein) चे प्रमाण कमी असणे.
  5. तुमच्या परिवारामध्ये केस गळतीचा त्रास असणे/ तुमच्या जेनेटिक मध्ये हा त्रास असणे.
  6. तुम्ही पुढीलपैकी कोणत्या रोगांची औषधे खात असाल तर केस गळती होऊ शकते- कर्करोग, अर्थराईटीस, नैराश्य, हृदयविकार.
  7. वजन कमी करण्यासाठी आहारात असंतुलित बदल केले असेल तर..
  8. गरोदरपणामुळे हार्मोन्समध्ये बदल होऊन केसगळती होते.
  9. केसांची गळती ही बदललेल्या पाण्यामुळे ही होऊ शकते.
  10. तुम्ही कडक पाण्यानी अंघोळ करत असाल/ केस धूत असाल तर केस गळती होऊ शकते.

        

  स्वागत तोडकर यांनी सांगितलेले केस गळती वरील उपाय


  1. त्रिफळा चूर्ण आणि गूळ हे प्रमाणातघेऊन त्याचे सुपारी एवढे गोळे करावे व हे गोळे रोज एक जेवल्यावर खावे नंतर कोमट पाणी प्यावे, असे तीन महिने कराव. याने केसांचे गळणे कमी होईल व वाढ जास्त होईल.

  2. पाव किलो साधं खोबरेल तेल, दोन तुळशीच पाने, दोन जास्वंदीची पाने, एक चमचा आवळ्याची पावडर, एक चमचा ब्राम्ही पावडर, मधमाश्यांच्या पोळ्याचे मेण 15 ते 20 ग्राम, ह्या सर्व गोष्टी शिजवून त्या गाळून घ्या. असे केल्याने हिरव्या रंगाचे तेल तयार होईल. मग त्या तेलानी रात्री झोपताना केसांच्या मुळांना मालिश करा.
            या तेलाने आठ रात्री सलग मालिश केल्याने पाचव्या दिवशी केस गळती थांबेल. त्यानंतर दर आठवड्याला फक्त दोन वेळा महिलांनी तर दररोज पुरुषांनी लावले तर चालेल.

  केस गळतीची कारणे | केसांवरील टिप्स | स्वागत तोडकर यांचे घरगुती उपाय
                                                      image source-google|image credit- youtube          

  3. वडाच्या कोवळ्या/ बारीक पांढऱ्या पारंब्या साध्या शुद्ध खोबरेल तेलात टाकून उकळवा व ते गाळून आठ दिवस झाकून ठेवा.( शक्यतो मातीच्या भांड्यात ठेवावे म्हणजे खूप जास्त प्रमाणात फायदा होईल ) त्यानंतर   परत गाळून घ्यावे. हे तेल दरवेळी केस धुण्याच्या आधीच्या रात्री लावा व सकाळी धुवून टाका. याने केस लांब सडक, सिल्की, गडद होतील व गेलेले केस परत येतील. याला थोडा वेळ जाईल पण केस येतील.

  4.आपण खाण्यासाठी आणलेल्या फळांच्या सालीने केस धुतल्याने त्याचा खूप सारा फायदा आपल्या केसांना होतो.

  5. एरंडयाचे तेल दर 15 दिवसातून एकदा तरी लावावे, हे तेल रात्री झोपताना लावावे व सकाळी उठून ते धुवावे. याने केस गळती थांबते, केस जाड होतील तसेच टक्कल पडलेलं कमी होईल.

  6. अंघोळ करताना कोमट पाण्याने करावी व त्यात लिंबू पिळून टाकावे. असे आठवड्यातून एखदा तरी करावे, त्याने केस गळती थांबते.
        जर तुम्ही केस डाय केले असेल किंवा कोणत्या रंगाने कलर केला असेल तर या उपायाने लावलेला रंग कमी होतो.

  7. एक आवळा घ्या व तो दीड लिटर पाण्यात टाकून ते पाणी अर्ध होईपर्यंत उकळवा व नंतर त्या पाण्याने मसाज करून ते केस तसेच ठेवा, मग अर्धा तासांनी धुवून टाका.

  8. संत्रीच्या साली रात्री भिजत ठेवा. सकाळी उठून ते पाणी उखळवून त्याची घट्ट पेस्ट करा व ते थंड करून लावा. याने केस गळती थांबेल, केस लांब होतील व केसांच्या समस्या दूर होतील.


  Dr Swagat Todkar hair oil

  Dr swagat todkar hair oil, dr swagat todkar hair oil price आणि dr swagat todkar hair oil online बदल जाणून घ्यायचे असेल तर पुढील नंबर वर फोन करून पूर्ण माहिती घ्या....

   Contact no. -  02312688800  केसांच्या आरोग्यासाठी काही टिप्स

  केस गळतीची कारणे | केसांवरील टिप्स | स्वागत तोडकर यांचे घरगुती उपाय
                                                 image source-google|image credit-fabmarks

  1. केस नेहमी कोमट पाण्याने धूवावेत, गरम पाण्याने धुवू नयेत.
  2. केसांना कोणतेही हेअर प्रॉडक्ट वापरत असाल तर झोपताना ते धुवून झोपा किंवा बाहेरून आल्यावर धुवा.
  3. केसांना नेहमी उन्हापासून आणि धुळीपासून वाचवावे, जमले तर कपडा गुंडळावा किंवा टोपी घालावी.
  4. केसांना आठवड्यातून दोनदा किंवा एकदाच धुवावे, ते रोज धुवू नयेत.
  5. तुम्ही बाजारातील केमिकल युक्त शॅम्पू कमी वापरवेत. जमले तर, बिना केमिकलचे शॅम्पू वापरा किंवा घरी शॅम्पू बनवा.
  6. केसांना हेअर ड्रायरची वाफ थोडी कमी गरम द्यावी किंवा त्याचा कमी वापर करावा.
  7. केसांचे आरोग्य वाढवण्यास योगासने करावेत. डोक्याला रक्त पुरावढा वाढेल अशी योगासने करा. (शीर्षासन)
  8. नियमित व्यायाम करावेत, त्यामुळे शरीरातील रक्त प्रवाह चांगला होईल.
  9. सर्व प्रकारच्या हेअर प्रॉडक्ट वापर कमी करा, वा टाळा किंवा गरज असेल तरच वापरा.
  10. हेअर कंडिशनर वापरताना ते फक्त केसांना लावावेत ते  स्काल्पला (टाळूला) लावू नयेत.
  11. आंघोळीनंतर हातानी किंवा टॉवेलनी केस रगडु व झटकू नयेत, त्याने केसांची घनता कमी होऊ शकते.
  12. केसांच्या स्काल्पला मालिश जास्त प्रमाणात करू नयेत व ती जास्त रगडु नयेत. त्याने केसांचे आरोग्य कमी होऊ शकते.
  13. केसांना भरपूर प्रमाणात तेल लावावेत, त्याने केसांचे आरोग्य खूप प्रमाणात चांगले होते. जर हे जमत नसेल तर रात्री झोपताना लावा व सकाळी धुवून टाका.
  14. केसांना तेल लावताना तुम्ही टाळू जास्त चोळू नका वरूनच तेल लावा.
  15. तुमची केस गळती होत असेल किंवा नसेल, तरी त्यांची काळजी आपल्या बाकीच्या अवयवाप्रमाणेच घ्यावी.

  वरील दिलेले सर्व केस गळतीची कारणे, केस गळतीचे उपाय व केसांच्या टिप्स करून पहाव्यात. जर यातून ही परिणाम नाही जाणवला तर त्वरीत डॉक्टरशी संपर्क साधा.
        Dr swagat todkar यांच्या hair oil बद्दल तुम्ही वरील दिलेल्या फोन वरून विचारा आणि ही पोस्ट तुमच्या जवळच्या मित्रांना, परिवाराला आणि नातेवाईकाना पाठवा.
  Thank you

  Post a Comment

  0 Comments