मधुमेह आणि भात | मधुमेहांनी भात खाणे योग्य की अयोग्य?


मधुमेहांनी भात खाणे योग्य की अयोग्य?

आज आपण मधुमेही रुग्णांनी भात खाणे योग्य की अयोग्य याबद्दल जाणून घेणार आहोत, त्यामुळे त्याबद्दल च्या सर्व मुद्यांची माहिती दिली आहे ती शेवट पर्यंत वाचा.

मधुमेहाची माहिती 

       मधुमेह हा आजच्या युगातील एक सामान्य आजारचं झाला आहे. दिवसांन दिवस मधुमेह रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. लोकांच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे व केमिकल युक्त खाण्यामुळे हा रोग सर्वांना जडत चालला आहे.

मधुमेह आणि भात | मधुमेहांनी भात खाणे योग्य की अयोग्य?

      मधुमेह रुग्णांनी त्यांचा आहार व व्यायाम दररोज नियमित केल्यास या रोगापासून त्यांना आपला बचाव व त्यावर मात ही करता येईल.
       आपल्या आहारामध्ये थोडेसे बदल करून तुम्ही या रोगापासून दूर जाऊ शकता. तुम्हाला आपल्या आहारामध्ये कमी ग्लाइसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ घ्यावेत. आता ग्लाइसेमिक इंडेक्स म्हणजे काय ते पाहूयात

ग्लाइसेमिक इंडेक्स

ग्लाइसेमिक इंडेक्स म्हणजे खाद्यपदार्थांना दिले जाणारे गुण आहेत. हे गुण खाल्लेल्या अन्नातून ग्लुकोज साखर सुट्टी होऊन रक्त प्रवाहात किती वेगाने येते त्यावर दिले जातात. याचे प्रमाण हे 0 ते 100 इतके आहे, जे पदार्थ शंभरच्या जितक्याजवळ ते मधुमेहांसाठी तितका हानिकारक व तो पदार्थ जितका शुन्याच्या जवळ तितका फायदेशीर आहे.

आता आपण आपल्या मुळं प्रश्नांवर म्हणजे भात खाणे योग्य की अयोग्य यावर येऊ व भातामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स चे प्रमाण किती? 
हे जाणून घेऊ...

तांदूळ/भाताचे प्रकार व माहिती


पांढरे तांदूळ - 

आपण सर्वजण बाजारातून पॉलिश केलेले पांढरे तांदूळ आणून त्याचा आपण भात करून खातो. पण या भातामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स चे प्रमाण हे 73 येवढे जास्त आहे आणि यामध्ये सामान्य कार्बोहायड्रेटसचे प्रमाणही जास्त असते.

                   मधुमेह आणि भात | मधुमेहांनी भात खाणे योग्य की अयोग्य?
     
        या कारणांमुळे पांढऱ्या तांदळाचा भात आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण लगेच वाढवतो, त्यामुळे आपण या भाताचे सेवन हे डाळ, भाजी व सलाद बरोबर करावेत किंवा याची खिचडी बनवून खावी. नाहीतर याचे प्रमाण कमी करावेत किंवा त्याऐवजी ब्राऊन तांदूळ खावेत.
                

ब्राऊन तांदूळ

ब्राऊन तांदळाला उकडीचे तांदूळ ही म्हणतात. पांढऱ्या तांदळामध्ये तांदळाची साल वेगळी केलेली असतात, तर ब्राऊन तांदूळ हे सालीसोबतच असतात. त्यामुळे यांच्या मध्ये मॅग्नेशियमसेलेनियम चे प्रमाण हे पांढऱ्या तांदळापेक्षा अधिक असते.

मधुमेह आणि भात | मधुमेहांनी भात खाणे योग्य की अयोग्य?

   ब्राऊन तांदळाचा ग्लाइसेमिक इंडेक्स हा साध्या तांदळापेक्षा थोडा कमी 68 येवढा असतो आणि यामध्ये सामान्य कार्बोहायड्रेट नसून जटिल कार्बोहायड्रेट असतात. त्यामुळे ते रक्तातील साखरेचे प्रमाण लवकर वाढवत नाहीत व ते हळुवार रक्तात विरघळतात. त्यामुळे तुम्हाला जमलेच तर तुम्ही पांढऱ्या तांदळा ऐवजी ब्राऊन तांदूळ तुमच्या आहारात वापरावेत.

बासमती तांदूळ 

बासमती तांदूळ ही मधुमेहीसाठी एक उत्तम निवड असू शकते, कारण बासमती तांदळाच्या भातामध्ये कमी कॅलरीस व फॅट असते तसेच यात सोडियम,आयर्न मॅगनिस चे प्रमाण हे ब्राऊन तांदळा पेक्षा अधिक असते.

मधुमेह आणि भात | मधुमेहांनी भात खाणे योग्य की अयोग्य?

         याचा ग्लाइसेमिक इंडेक्स ही 55 ते 60 च्या दरम्यान इतका कमी असतो. त्यामुळे याचा वापर मधुमेही आपल्या आहारात करू शकतात.

जास्मिन तांदूळ

जास्मिन तांदूळ हे आशिया खंडामध्ये पिकवले जातात. हे तांदूळ जणू बासमती तांदळाचे भाऊच आहे कारण त्यामध्ये  बासमती तांदळासारखेच घटक आढळतात. याचा ग्लाइसेमिक इंडेक्स हा थोड जास्त 70 ते 74 दरम्यान एवढा आहे. हे तांदूळ मिळणे अवघड असू शकते त्यामुळे ऑनलाइन खरेदी करावेत.

मधुमेह आणि भात | मधुमेहांनी भात खाणे योग्य की अयोग्य?

        या वरील तांदळाच्या/ भाताच्या प्रकारातील तुम्ही कोणतेही तांदूळ तुमच्या आहारामध्ये अवलंबू/ वापरू शकता, पण तुम्ही त्याचे संतुलित प्रमाण आपल्या आहारात घ्यावे.

तुम्ही भात बनवण्याची पद्धत बदलावी 

तुम्ही भात शिजवताना कुकर ऐवजी मोठ्या टोपात किंवा पॅनमध्ये शिजवावे व त्यात भरपूर पाणी घालावे आणि भात शिजल्यानंतर त्यांतील अतिरिक्त पाणी टाकून द्यावे. याने भातातून अतिरिक्त असलेले स्टार्च कार्बोहायड्रेट निघून जातात. तुम्ही हे अधिक असलेले पाणी पेज म्हणून तुमच्या मुलांना देऊ शकता.

आहारातील भाताचे प्रमाण 

 तुम्ही आहारात भाताचे प्रमाण हे कमी व संतुलित करावे. भात हा आधिच ताटात थोड्या प्रमाणात वाढून घ्यावे, तो चमच्याने सारखा घेऊ नयेत याने भात खाण्याचा अंदाज येत नाही. जेवण करताना भाताबरोबर डाळ, भाजी खावीत व जेवणात सलाद जरूर घ्यावेत, याने तुमच्या शरीरातील टॉक्सिक निघून जातील तसेच कच्या सलादमुळे शरीराला काही आवश्यक घटक मिळतील.

       वरील दिलेल्या सर्व माहितीचे अवलंब तुम्ही तुमच्या जीवनात केलेत, तर तुम्हाला भात खाल्याने काहीही फरक पडणार नाही.
   त्यामुळे भात खाणे हे मधुमेहीसाठी योग्य आहे, पण त्याचे प्रमाण हे संतुलित पाहिजे.
धन्यवाद /Thank you.

    Post a Comment

0 Comments