डॉ. स्वागत तोडकर यांचे ४० हून अधिक घरगुती उपाय (Dr. swagat todkar gharguti upay)
डॉ. स्वागत तोडकर हे एक प्रसिध्द व्यक्तीमत्त्व आहेत आणि तुम्ही त्यांचे नाव ऐकलेच असेल. त्यांच्या उपचारांनी लाखो/करोडो लोक बरे झाले आहेत.
डॉ. तोडकर हे पदवीधर डॉक्टर नसले, तरी ते स्वस्तात व कमी रुपयात लोकांचे उपचार करतात व लोकांना घरगुती उपायातून ठीक होण्याचे सल्ले देतात.
हे ही वाचा :- Dr. Swagat Todkar यांची संपूर्ण माहिती
तोडकर यांचे उपाय हे घरगुती असतात व त्यांच्या उपायांचा फायदा बऱ्याच लोकांना झाला आहे. त्यांनी बऱ्याच आजारांवर उपाय सांगितलेले आहेत. पण, त्यातील 40 हून अधिक उपाय हे पुढीलप्रमाणे;
![]() |
Image source - Google| Image Credit - Website |
डॉ. स्वागत तोडकर यांचे हृदय विकार, ताप, खोकला अशा इत्यादी रोगांवर घरगुती उपाय/Home Remedies:-
1. सर्दी/कफ
- लसूनचा रस दोन थेंब आणि कवट्याचा रस दहा थेंब कोमट पाण्यात एकत्र करून दिवसातून तीन वेळा (सकाळ, दुपार, संध्याकाळ) प्या. यामुळे इन्फेक्शन, दम्याचा त्रास, श्र्वसनाचा त्रास, कमी होतो.
- जवस आणि खडीसाखर सम प्रमाणात घेऊन त्याची पावडर करा. (जवस जाळून त्याची राख करून घ्या) अर्धा चमचा सकाळी आणि संध्याकाळी कोमट पाण्याबरोबर घ्या, त्यामुळे श्वास नलिकेतील प्रॉब्लेम निघून जातो.
हे ही वाचा :- सर्दी, खोकला व ताप यावर Dr. Swagat todkar यांचे घरगुती उपाय व काही इतर उपाय.
2. डोळे
- तुळशीच्या पानांचा रस लहान मुलांच्या तसेच खाऊच्या पानांचा रस मोठ्या माणसांच्या डोळ्यात घातला तर चष्मा निघून जातो.
- शेवग्याची साल काढा व ती पाण्यात उकळवा व गाळून घ्या आणि त्याने डोळे धुऊन घ्या, त्यामुळे चष्मा निघून जातो.
- कापुराचे पाणी करून ते गाळावे व डोळ्यात घालावे, त्याने डोळ्यांना थंडावा व आराम मिळतो.
- दगडी पाल्याचा रस काढून तो गाळावा व आठवड्यातून एकदा तो डोळ्यात घालावा, त्यामुळे डोळ्यातील नसा कमजोर होत नाहीत.
- उंबराचे फळ कापून डोळ्यांवर तासभर ठेवावे याने डोळ्यांना आराम भेटेल असे डोळ्यांचा त्रास कमी होईल व तुम्हाला चष्माचा त्रास कमी होईल.
- कोणते फळ जर खराब होत आले असेल, तर त्याचा लगदा करून ते डोळ्यांवर किंवा चेहऱ्यावर लावा यामुळे डोळ्यांना व चेहऱ्याला आराम भेटेल.
- खाऊचे पान मिठाच्या पाण्याने धुवून त्यांचा रस करून एक थेंब डोळ्यात घाला, याने डोळ्यांचे आरोग्य वाढेल व डोळ्यांचे आजार कमी होतील.
3. डोकेदुखी
- मीठ घ्या व थोडे ओले करून कपाळाला लावा त्यामुळे डोकेदुखी थांबेल.
- लसुन चुरडून डोक्याला लावला तर डोकेदुखी थांबते.
4. गुडघेदुखी/संधिवात
- गुडघेदुखी, मणक्याचा त्रास, संधिवात, कंबरदुखी या सर्व गोष्टींचा त्रास असेल, तर सुके खोबरे ,खारीक आणि गूळ एकत्र करा आणि खा, त्यामुळे हे त्रास निघून जातील.
- पांढरा कांदा घ्या व त्यातील अर्धा कांदा खिसा आणि त्यात थोडा गुळ टाका, यामुळे कंबर दुखी, गुडघेदुखी तसेच कॅल्शियम वाढते हा उपाय लहान मुलांना तसेच मोठ्या माणसांना फायदेशीर आहे.
- पांढरे तीळ रोज एक चमचा खावे गुडघेदुखीचा त्रास कमी होईल. ज्यांना जास्त त्रास आहे, त्यांनी तिळाचे तेल रोज एक चमचा सकाळ-संध्याकाळ घ्यावे आणि त्यावर कोमट पाणी प्यावे.
- काळी खारकेची पावडर करून दोन महिने खावी, यामुळे मणक्यातील गॅप व गुडघ्यातील समस्या दूर होतील.
- संधिवाताचा त्रास होत असेल, जबडा उघडत नाही, यावर तिळाचे तेल एक चमचा सकाळी प्या व संध्याकाळी एक चमचा एरंडाचे तेल प्यावे, दोन्ही तेलावर कोमट पाणी प्यावे सर्व त्रास जातील.
- बाभळीच्या झाडाची साल काढून ती गरम पाण्यामध्ये उकळवा व ते पाणी कोमट करून गुडघ्यावर ओतून घेतल्यावर गुडघे दुखी थांबते.
5. दाताचा/दाढेचा त्रास
- वावडींगा चिमटीभर घ्यावे व भिजवून कापडाला बांधून दाताखाली ठेवावे यामुळे दातदुखी थांबते व कीड निघून जाते.
- निरगुडी च्या पाण्यात मिठाचा गोळा ठेवावा व जिथे दाढ दुखत असेल तिथे ठेवावे त्यामुळे दाढदुखी थांबते.
- दाढ दुखत असेल तर लवंग दाढेखाली धरा त्याने दाढ दुखायची लगेच थांबेल.
- पेरूचे पान रोज किंवा आठवड्यातून दोन वेळा चावून खा त्याने मुख शुद्धीकरण व दात मजबूत होतील.
- लाजाळूच्या पानांचा रस दाढेमध्ये घाला यामुळे दाढ सुजली असेल तर तीही कमी होते.
6. पोटाचे विकार
- तुळशीची पाने ,वाळलेल्या मंजिरी व तुळशीच्या साली हे सर्व तीन कप पाणी घेऊन ते एक कप होईपर्यंत उकळवा व गाळून प्या असेच पाच ते सात दिवस करत रहा याने रक्तशुद्धीकरण व पोटाचे विकार निघून जातील.
7. तोंड येणे
- तोंड आले असेल तर पेरूच्या पानांचा रस वाटीभर काढा व तो गुळन्या करत राहावा(जोपर्यंत दुखणे थांबत नाही) असे दहा मिनिटे करत राहावे, याने दुखणे थांबायला मदत होईल व तिखट खाल्ल्यावर दुखणार नाही.
8. घशाचा त्रास
- खाऊच्या पानात जायफळाचा लेप लावून ते गळ्यावर लावावे, त्यामुळे घसा दुखणे, कफ, घसा खवखवणे दूर होईल.
- घाणेरीच्या पाण्यात मीठ टाकून खावे, त्यामुळे खोकला तसेच कोरडा खोकला निघून जातो.
9. त्वचा रोग / त्वचा आरोग्य
- जर केळी खराब झाली असतील, काळी झाली असतील, तर त्यांचा साबण म्हणून वापर करू शकता. तुम्ही ते केळ व त्याचे साल घोटून त्याचा लेप शरीराला लावा व दहा मिनिटे थांबून मग आंघोळ करावी, त्यामुळे कोणतेही त्वचा रोग राहणार नाही आणि यामुळे त्वचा गोरी होते.
- कोणतेही फळ जर खराब होत आले असेल तर त्याचा लगदा करून ते डोळ्यांवर किंवा चेहऱ्यावर लावा त्यामुळे डोळ्यांना व चेहऱ्याला आराम भेटेल.
- खारीक उगळून टाचांना लावा, त्यामुळे फुटलेल्या टाचा बऱ्या होतात, तसेच शरीरावरील त्वचेला लावल्यास त्वचेवरही चांगला परिणाम होतो.
- तुळशीची मंजिरी आंघोळीच्या पाण्यात टाका ती नाही मिळाली तर तुळशी ड्रॉप मेडिकल मधून आणा व दोन थेंब अंघोळीच्या पाण्यात टाका, यामुळे शरीरावरील जंतू मरतील आणि स्किन प्रॉब्लेम निघून जातील.
10. मधुमेह
- जांभळाच्या झाडाची पाने मिठाच्या पाण्यात नीट धुवून रोज दोन ते तीन पाने खावी यामुळे तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण लवकर कमी होईल किंवा जांभळाच्या झाडांची पावडर करून खाऊ शकता.
- जांभळाच्या बियांची पावडर आणि आवळ्याची पावडर समप्रमाणात एक चमचा सकाळ व संध्याकाळ घ्या, यामुळे एकाच दिवसात मधुमेह चे होणारे सर्व त्रास कमी होतील व परत जाणवेल. हात-पायांची होणारी जाळ कमी होईल.
हे ही वाचा :- मधुमेहांनी भात खाणे योग्य की अयोग्य?
11. खोकला
- कपरी कात उगाळून घ्यावे व त्यावर कोमट पाणी प्यावे, या उपायाने तुमचा घसा बसलेला असेल तर ठीक होईल व घशाच्या समस्या दूर होईल.
- अर्धा चमचा दालचिनी पावडर एक ग्लास दुधात मिसळून उकळावे व ते गाळून प्यावे, याने कप व खोकला निघून जातो.
- तुळशीच्या पानांच्या रसामध्ये थोडेसे कापूर घालून ते मिश्रण पिया आणि त्यावर तांब्यांभर गरम पाण्यानी गुळण्या कराव्यात. या उपायाने लगेच खोकला जातो.
- तीन कप पाणी घेऊन त्यामध्ये सुंट पावडर व दालचिनी पावडर एकत्र करा व ते एक कप होईपर्यंत आठवा अर्धा कप सकाळी व संध्याकाळी घ्या सर्दी, ताप, खोकला गायब होईल.
12. ताप
- एक वाटी दुध घेवून त्यात अर्धा चमचा हळद व 1 चमचा सुंट पावडर टाकून ते उखळवा आणि गाळून प्या, यानंतर अंगावर घेऊन झोपावे. याने तुमचा ताप अर्ध्या तासात निघून जाईल.
- सुंट पावडर व दालचिनी पावडर एक एक चमचा घेऊन 3 कप पाण्यात टाकून ते 1 कप ऐवढं करा आणि हा काडा अर्धा चमचा सकाळी व संध्याकाळी घ्या. याने ताप, सर्दी व खोकला निघालो जातो.
13. जखम
- दगडी पाला च्या झाडांच्या पानाचा रस करून कोणतेही जखम झाल्यानंतर किंवा कापल्यावर तो रस लावा. हा जखम बरी होण्यासाठी उत्तम घरगुती उपाय आहे.
- कोणतीही जखम लवकर बरी होत नसेल तर पूर्ण पिकलेला पेरूचा चुरा घ्या व त्यात एक चमचा मध मिक्स करून रोज जखम पूर्ण बरे होईपर्यंत खावा,यामुळे कोणतेही जखम लवकरात लवकर बरी होते.
14. हृदय
- बेलाचे फळ अर्धे कापून त्यातील गर घेऊन त्यात एक चमचा भर मध टाकावे व ते खावे याने हृदयाला फायदा होतो, तसेच हृदयात होल असतील तर ते बरे होतात. हा हृदयाची काळजी घेण्यासाठी एक उत्तम घरगुती उपाय आहे.
15. रोगप्रतिकारशक्ती
- अर्धा ग्लास मोसंबीचा रस व अर्धा ग्लास पाणी घ्या आणि त्यात जिरा पावडर व सुंठ पावडर टाका आणि हे मिश्रण सकाळी अनुशी पोटी घ्या, यामुळे इम्मुनिटी व रोगप्रतिकारशक्ती वाढते, तसेच पचनक्रिया व्यवस्थित होते व कफाचा त्रासही कमी होतो.
- एक कप गरम पाणी घ्या त्यामध्ये दहा थेंब लसणाचा रस आणि दोन थेंब मध मिक्स करा आणि हे मिश्रण सकाळी अनुशापोटी घ्या, त्यामुळे इम्युनिटी चांगली होते व शरीराला ताकद मिळेल, तसेच घसा आणि नाकाचे प्रॉब्लेम निघून जातील.
16. बीपीचा त्रास (Blood Pressure)
- आंघोळ करताना तोंडात (तोंड भरून) पाणी धरून आंघोळ करावी, त्यामुळे स्टॅमिना वाढतो, रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि बीपीचा त्रास कमी होतो व सर्दी, खोकला, ताप ही निघून जाईल.
- तोंडात पाणी धरून आंघोळ करावी यामुळे स्टॅमिना वाढतो, रोगप्रतिकार शक्ती वाढते, बीपीचा त्रासही कमी होतो. सर्दी-खोकला-ताप निघून जाईल.
17. केस
- एरंडयाचे तेल दर 15 दिवसातून एकदा तरी लावावे, हे तेल रात्री झोपताना लावावे व सकाळी उठून ते धुवावे. याने केस गळती थांबते, केस जाड होतील तसेच टक्कल पडलेलं कमी होईल.
- एक आवळा घ्या व तो दीड लिटर पाण्यात टाकून ते पाणी अर्ध होईपर्यंत उकळवा व नंतर त्या पाण्याने मसाज करून ते केस तसेच ठेवा, मग अर्धा तासांनी धुवून टाका. केस गळती थांबेल व केसांच्या समस्या दूर होतील.
वरील दिलेले,
डॉ. स्वागत तोडकर यांचे घरगुती उपाय/उपचार किंवा Dr. swagat todkar Home remedies, हे त्यांच्या भाषणातून घेतलेले आहेत व ते योग्य आहेत. पण, काही उपचारांचा वापर करताना माझ्या मते तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आमची माहिती वाचल्याबद्दल तुमचे धन्यवाद,
ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रांना व परिवाराला शेअर करा.
आमची दुसरी वेबसाईट (Website): https://www.quotescafe.xyz/
0 Comments